Friday, June 3, 2016

पाऊस

आज पुन्हा पावसाने घात का केला? 
अवेळी कसा कोण जाणे बरसत आला?
तिला नाही आवडत एकटं पावसात भिजायला
नजर मग तिची शोधू लागली त्याला
हात त्याच्या हाती देऊन
त्याच्या नजरेने
चिंब व्हायचं आहे तिला
पण असा कसा हा पाऊस अवेळी आला?
आजवर तिने अनेकदा
एकटीनेच पाऊस पाहिला
मनात त्याचं चित्र रेखाटून
त्याच्या भोवती गिरक्या घेतल्या
पण आता का करावं असं काल्पनिक काहीतरी
कारण आता तो आलाय
तिच्या आयुष्यात
तिने रेखाटलेल्या चित्रासारखा
हुबेहुब नाहीये कदाचित
पण तो आहे फक्त तिचा म्हणून
सगळं काही आलंय अगदी छान जुळून
मग हा पाऊसच का आलाय
अयोग्य वेळ साधून?