माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी.....
होते माय थोर
कधी जराशी कठोर
कधी खट्याळ प्रेयसी
वाटे साऱ्यांना हवीशी
कधी लाडाची बहिण
जाई दुसर्याच्या घरी
कधी आजी ती होऊन
दावी गोष्टीतून परी
भार्या होऊन कुणाची
त्याच्या जीवा जीव देई
होऊनिया कधी सखी
मैत्रीचेही भान राखी
कधी डोळा तिच्या आसू
कधी खळाळत हासू
हसू साऱ्यांनाच दिसे
आसू पहाया कुणी नसे
No comments:
Post a Comment