दोन आठवड्यापूर्वी दुचाकीवरून जाताना छोटासा अपघात झाला आणि गाडी दुरूस्तीसाठी द्यावी लागली. त्यामुळे जवळजवळ सहा महिन्यानंतर बसने प्रवास करण्याचा योग आला.
योग म्हणण्याचे कारण म्हणजे बस, लोकल ट्रेन किंवा इतर पर्याय (सहाआसनी वगैरे) यांनी प्रवास करणे मला प्रचंड आवडते पण दुचाकी वापरायला सुरुवात केल्यामुळे ते हल्ली दुर्मिळ झाले आहे. या प्रवासात नाना प्रकारचे लोक भेटतात, निरीक्षणं करायला मिळतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक माणूस बरंच काही शिकवून जातात. या सगळं पाहिल्यावर उगाच पर्वताएवढे वाटणारे स्वतःचे छोटे छोटे प्रश्न अचानक राईएवढे वाटू लागतात.
असो नमनाला घडाभर तेल कशाला?
तर झालं असं, मी वाट पहात होते बसची पण काही केल्या बस येईना. जवळच माझ्या घराकडेच जाणारी सहाआसनी रिक्षा निघण्याच्या तयारीत होती. मग विचार केला की इथे वाट पहात बसण्यापेक्षा अर्धे अंतर नक्कीच जाईन आणि मग बसले.
दोन दिवसांपूर्वीच पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत होता आणि मस्त वाटत होतं. हिरवीगार शेतं एका नव्या जोमाने डोलत होती.
माझ्यासह आणखी १३ माणसांना दाटीवाटीने बसवले होते नव्हे कोंबले होते. सहाआसनी मध्ये १३ प्रवासी+१ चालक हे फक्त भारतातच घडू शकते.
माझ्याच शेजारी एक मुलगा बसला होता. चेहर्याने साधारण १२-१३ वर्षांचा वाटत होता पण नेमका अंदाज येत नव्हता. हातात मोबाईल फोन घेऊन काहीतरी करण्यात मग्न होता. मला वाटले गेम खेळत असावा. काय करणार होता तो बिचारा एवढ्या गर्दीत? कंटाळून गेला असेल असं वाटत होतं.
हल्ली तुम्ही बस किंवा ट्रेन मध्ये बसलात की शेजारची व्यक्ती मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेली असते. बर्याच वेळाने चुकून जर त्या व्यक्तीने मान वर केली तर चेहरा दिसतो. ओळखीची व्यक्ती सुद्धा मान वर करेपर्यंत अनोळखी वाटते.आपण मोठेच असे वागतो, तिथे या चिमुरड्यांना दोष का द्यायचा? शेवटी ते आपलंच अनुकरण करतात ना...
थोड्या वेळाने पुन्हा नजर त्या मुलाकडे वळली आणि पाहिलं तर काय फेसबुक उघडून बसला होता. मग मात्र काय आहे याचं वय याची उत्सुकता आणखीनच वाढली. म्हणून मग विचारलंच त्याला शेवटी, “कितवीत आहेस तू?“
जरासा गोंधळला आणि मग हळूच उत्तर दिलं, “सहावी...“
एकंदरीत त्याच्याकडे पाहून आणि गोंधळलेला त्याचा चेहरा पाहून एका छोट्याश्या गावातील असावा असं वाटलं आणि ते सुद्धा खरंच होतं. माझं लक्ष त्याच्याकडे आहे हे लक्षात आल्यावर थोडावेळ त्याने मोबाईल माझ्यासमोर काढला नाही. पण १०-१५ मिनिटांत पुन्हा मोबाईल मध्ये मग्न झालाच. आता आणखी काही प्रश्न विचारले तर तो अजुन भांबावेल या विचाराने स्वतःला आवरले आणि शांत बसून फक्त निरीक्षण करायचे असे ठरवले.
आता मला त्याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे शक्य झाले कारण त्याने मोबाईल मध्ये लक्ष केंद्रित केले होते.
मोबाईल फोनची भाषा मराठी होती. या मुलाला आपण काही काळ Facebook कुमार म्हणूया (किंवा fb कुमार). या आपल्या fb कुमाराला फेसबुक म्हणजे काय हे नुसतं माहीत नव्हतं तर तो सक्रिय वापरकर्ता (active user) असावा असे वाटत होते. त्याने त्याचे स्वतःचे खातेही (profile) तयार केले होते. स्वतःचा फोटो आवडला नव्हता कदाचित किंवा शाहरुख खानचा खूप मोठा चाहता असावा म्हणून त्याने शाहरुख खानचा फोटो profile picture ठेवला होता. मला वाटले की फक्त खाते उघडले आहे फेसबुक वर पण इतक्यातच थांबला असता तर त्याचे नामकरण फेसबुक कुमार किंवा fb कुमार ठेवले नसते... त्याच्या मित्रांच्या यादीत ६0-७0 मित्रमैत्रिणी होते तेही कदाचित त्याच्या वयाचे असावेत असा अंदाज. आमच्या समोरच एक महाविद्यालयीन युवक बसला होता. पदवी किंवा तत्सम काहीतरी करत असावा. त्याचा लक्षात आलं माझं निरीक्षण अन् मग माझ्याकडे पाहून कुत्सित हसला आणि म्हणाला, " अवघड आहे या पिढीचं ! " मलाही मग हसू आलं की केवळ ६-७ वर्षांनी मोठा आहे हा त्या फेसबुक कुमारापेक्षा पण चक्क एका पिढीचं अंतर मानत होता स्वतः आणि फेसबुक कुमारामध्ये...
अजूनही माझे प्रश्न मला स्वस्थ बसू देत नव्हते मग fb कुमाराला विचारले, "कुणाचा आहे हा मोबाईल? आईचा की बाबांचा? "
त्याने माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले मग त्याच्या शेजारी बसलेली स्त्री त्याची आई असावी असं वाटलं म्हणून मी तिला विचारले, "तुमचा मुलगा आहे ना? कशाला द्यायचा एवढ्या लहान मुलाला मोबाईल?" पण नेमका माझा अंदाज चुकला आणि कोपर्यात इतका वेळ शांत बसून असलेली त्याची आई म्हणाली, "माझं पोरगं आहे ताई. आमाला काय बी कळत नाही त्यातलं, याच्या बापाला अन् मलाबी. कोणचा मोबाईल घ्यायचा तेबी कळत नवतं. पर पोरगं लय हुशार. त्याला समदं कळतंय त्यातलं. त्योच वापरतो."
मग मी थोडं समजुतीच्या स्वरात म्हणाले, "अहो आहेच तो हुशार. इतक्या लहान वयात इतकं सगळं कळतंय त्याला. पण अहो अशाने तो नको त्या गोष्टी पण वापरत असेल ना , ज्या त्याने वापरायला नको आहेत. "
तरीही त्याच्या आईचं एकाच म्हणन होता, "आवो सगळ कळतंय त्याला. लई हुशार हाये तो . ' असं बोलून त्या थांबल्या.
आता डोक्यात विचारचक्र सुरु झालं. नवीन तंत्रज्ञान आलंय अगदी प्रत्येक जण ते वापरतोय नक्कीच चांगली गोष्ट आहे पण … या पण ने मात्र गोंधळ सुरु केला होता आता माझ्या डोक्यात. ज्यांचे आईवडील सुशिक्षित आहेत त्यांना हे सांगा येऊ शकतं कि आपली मुलं काय पाहतात काय नाही याकडे लक्ष ठेवा तर एकवेळ ठीक आहे पण ज्यांना स्वताला तंत्रज्ञानाबद्ददल काही माहिती नाही, जिकडे शिक्षणाचा अभाव आहे त्यांना हे सगळ कसा समजावणार? मग अशा वेळी या चिमुरड्यांना कोण योग्य मार्ग दाखवणार? मग अशावेळी मार्ग दाखवणारा एकाच वाटाड्या समोर दिसतो आणि ते म्हणजे त्यांचे शिक्षक, कारण मुलांचा सर्वात जास्त वेळ शाळेत जातो. ते नक्कीच त्यांना मदत करू शकतील. इंटरनेट वापराच असेल तर नक्की त्याचा वापर कसा व्हायला हवा हे शिक्षक मुलांना सांगू शकतील. पण त्यासाठी आपण नक्कीच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडे तंत्रज्ञानाचा विकास होतोय याच गोष्टीवर फक्त भुरळून न जाता त्यातून होणारे संभाव्य तोटे पण लक्षात घ्यायला हवेत.
हल्ली बर्याचवेळा उन्हाळ्याची, दिवाळीची सुट्टी सुरु झाली किंवा इतर वेळीही गेम खेळण्यासाठी म्हणून cyber cafe मध्ये जातात. बरं ताशी १५-२० रुपये इतका दर असतो त्यामुळे पालकही या गोष्टीला नाही म्हणत नाहींत कारण तेही विचार करत असतात कि घरात बसून कंटाळा आलाय हे ऐकण्यापेक्षा १५-२० रुपये देणे परवडले. पण त्यावेल्ली ते हा विचार करत नाहीत कि तिकडे जाऊन आली मुले नक्की काय करतात? हल्ली शाळांमधूनही अनेक projects करायला सांगितले जातात त्या निमित्तानेही मुले cyber cafe मध्ये जातात.
मुलांनी इंटरनेट वापरणे ही गोष्ट चुकीची नाही पण काय आणि कसा वापरावं याचं मार्गदर्शन आपण त्यांना करायला हव. जेणेकरून ते इंटरनेट चा उपयोग अनेक चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी करू शकतील…

हे खरंय प्रवास करतांना खूप मस्त अनुभव येतात. लहान लहान मुलं fb वर असतात आजकाल, शाळांचे ग्रुप आहेत तर काय…. छान लिहिलयेस
ReplyDeleteहो ना गं...प्रवास म्हणजे अनुभवांची खाण असते,फक्त डोळे उघडे असावे लागतात...वेळ काढून पोस्ट वाचलीस त्यासाठी धन्यवाद :-)
ReplyDelete