फितुरी
धुंद सारी पावसाच्या
घेऊन जातात कधी मला
आठवणींच्या गावाला
जिथे दूरपर्यंत माळरानाच
आहे माझ्या साथीला
धुंद सारी पावसाच्या
बरसतात तुझ्याचसारख्या
कधी अखंड अविरत
तुझेच शब्द होऊन
अन कधी नुसताच
बोलावं नयनांतून
धुंद सारी पावसाच्या
ज्यांच्यासाठी
चातक झालाय आतुर
माझ्याचसारखा
अन माझे शब्दही
झालेत तुझेच फितूर
धुंद सारी पावसाच्या
हल्ली नकोशाच वाटतात
येण्याचे वाचन देऊन
ऐनवेळी घात करतात
खरच का रे त्याही
तुझीच फितुरी करतात?
मस्त प्रियांका.....!
ReplyDeleteधन्यवाद प्रवीण... :-)
ReplyDelete