Thursday, February 25, 2016

काहीतरी

काहीतरी हरवतं
काहीतरी गवसतं
जे नेमकं हवं असतं
तेच का दुरावतं ?

काहीतरी मिळावं म्हणून
मन रुसून बसतं
तेच हवं यासाठी
किती आटापिटा करतं ?

काहीतरी दूर जातं
काहीतरी जवळ येतं
पळत्याच्या पाठी धावताना
मिळालेलंही निसटत जातं

काहीतरी बोलावं
काहीतरी ऐकावं
ऐकताना मधूनच
मनानं गतकाळात जावं

काहीतरी सरतं
काहीतरी उरतं
हिशेब मांडला कि उत्तर
शून्यातच का मिळतं ?


No comments:

Post a Comment